घरगुती उपाय (Home Remedies)
- rugveda pande
- Apr 23
- 2 min read
Updated: Aug 3

घरगुती उपाय
Disclaimer: कृपया तीव्र लक्षण आढळल्यास आपल्या बालरोग तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. हे उपाय केवळ अनुभवावर व पिढ्यानपिढ्या आलेल्या ज्ञानावर आधारित आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हे व्यावसायिक वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाहीत.
सर्दी/खोकला
लसूण माळ गळ्यात घालणे किंवा लसूण पाकळी शर्टच्या खिशात ठेवणे
जवस पोटलीचा शेक: एक चमचा जवस घेऊन एका रुमालामध्ये बांधायचा. एक पातेलं तापवून त्यात ती पोटली गरम करायची आणि बाळाची छाती, पाठ व कमरेला शेक द्यायचा. ⚠️ पोटली बाळाच्या त्वचेला लावण्यापूर्वी तपमान नक्की तपासा!
वेखंडा: वेखंडा बाळाच्या टाळूवर, छातीवर, गळ्यावर, पाठीवर आणि तळपायावर लावायचा. बाळाने वेखंड्याचा वास घेतल्याने शिंकून नाकातील स्राव बाहेर येतो.
वेखंडा, ओवा आणि बडीशेप यांची धुरी: कढईत सुकं फोडणं टाकून त्यात हे साहित्य जळवायचं, जेव्हा धूर निघू लागतो तेव्हा बाळाला त्या धुरावर धरायचं. बाळ खोकला तर समजायचं की धूर आत पोचला आहे.
बाळाला गॅसेस/सर्दी/खोकला असल्यास, स्तनपान करणाऱ्या आईने ओवा दिवसातून तीन वेळा खावा. ओवा खाऊन बाळाच्या नाभीवर आणि नाकावर फुंकर द्यावी.
हळद आणि ओव्याची धुरी द्यायची: लोखंडी तवा किंवा कढई खूप गरम करून गॅस बंद करायचा, त्यावर हळद आणि ओवा टाकायचा. बाळाला त्या धुरावर १० सेकंद धरायचं, मग बाजूला करायचं. बाळाच्या नाकात धूर गेला पाहिजे. थोड्या वेळाने पुन्हा १० सेकंद धुरावर धरायचं. ३-४ वेळा हा उपाय करायचा, जोपर्यंत धूर कमी होत नाही.
OTC (ओवर द काउंटर) औषधं:
Hyland’s Cold and Cough (Infants आणि Children साठी उपलब्ध)
Zarbee’s (Infants आणि Children साठी उपलब्ध)
Tylenol/ Motrin (तापासाठी)
बद्धकोष्ठता (कॉन्स्टिपेशन)
१ चमचा तूप व कोमट पाणी – दिवसातून तीन वेळा – सगळ्यांनी रोज करायला हरकत नाही
सगळ्यात प्रभावी: एरंडेल तेल दिवसातून तीन वेळा
भेंडीची भाजी
पपई
मनुका रात्री भिजवून सकाळी त्याचे पाणी
केळं
बेंबी व बोटांभोवती खोबरेल तेल
कोमट पाण्याने अंघोळ
बाळाच्या बेंबीभोवती हिंगाचं पाणी लावायचं – १ चमचा पाण्यात १ चिमूट हिंग टाकायचा
गॅसेस
आईने एक चमचा ओवा खायचा. जर तीला तिखट वाटलं, तर त्या वाफेचा उपयोग बाळाच्या बेंबीवर व तोंडात फुंकर म्हणून करायचा
खोबरेल किंवा इतर कोणतंही तेल कोमट करून बाळाच्या बेंबीमध्ये टाकायचं – नंतर त्या तेलाचा बेंबीभोवती गोल गोल मसाज करायचा
ओवा व बाळंतशेपाचं पाणी उकळून त्यात बाळाचा भात शिजवायचा – जर बाळ सॉलिड्स खात असेल तर
Mama Earth चा Tummy Roll-On – (त्यात हिंग व बडीशेप तेल आहे) – ३ महिन्यांपासून पुढच्या बाळांसाठी योग्य
पोटावर शेक देणे, बेंबीभोवती तेल लावून मसाज करणे आणि सायकल लेग्स एक्सरसाइज करणे
ताप
पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवणे
कांदा किसून त्याचे पाणी बाळाच्या तळपायांना लावणे
सर्दी/खोकल्याने आजारी स्तनपान करणारी आई – घरगुती उपाय
वाफारा – पाण्यात Vicks टाकून
Cough drops किंवा lozenges
Robitussin किंवा कोणतीही Guaifenesin असलेली Syrup
सितोपलादि
मध + १ tsp बेकिंग सोडा
झोपण्यापूर्वी उष्ण दूधात सितोपलादि चूर्ण (घशाच्या वेदनेवर आणि खोकल्यावर उपयुक्त)
दात येणं (Teething)
Dentonic ४ गोळ्या
Frozen pacifiers/teethers/ popsicles (वय पाहून)
Orajel चा Gum Massage
लवंग तेलाने मसाज (फारच थोडं तेल वापरायचं – खूप उष्ण आणि तिखट असतं)
दात येत असताना ताप आल्यास – Tylenol


Comments